Leader

शिरूर! वडगाव रासाई–मांडवगण जिल्हा परिषद गटात उमेदवारीसाठी रिघ…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील वडगाव रासाई–मांडवगण जिल्हा परिषद गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी पुरुष) आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्वच पक्षांकडून इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने या गटात तिकीट वाटपासाठी […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक! टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचा ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय आढावा

शिरूर (नितीन थोरात): जिल्हा परिषद निवडणूक 2026 च्या टाकळी हाजी या गटामध्ये पंचायत समितीचे दोन गण समाविष्ट आहेत. या जिल्हा परिषद गटात सन 1962 मध्ये सत्ता विकेंद्रीत करण्याचा आणि त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या स्थापन झाल्या तेव्हापासून टाकळी हाजी गावचे माजी आमदार श्री. पोपटरावजी गावडे साहेब यांना सातत्याने नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांच्या बरोबरीने […]

अधिक वाचा..
mandavgan-voting

वाघोलीला मतदानासाठी आलात तर रडस्तोर मारून पोलिसांच्या हवाली केले जाईल…

शिरुरच्या पुर्व भागात वाघोली मतदार यादीतील दुबार नावांवरुन फ्लेक्सबाजी… शिरूर (तेजस फडके) : पुणे महानगरपालिका हद्दीतील वाघोली येथील मतदार यादीत शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आढळून आल्याने निवडणुक व्यवस्थेतील गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभुमीवर मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, वडगाव रासाई, इनामगाव, निर्वी, बाभुळसर बुद्रुक, पिंपळसुटी, तांदळी आदी गावांमध्ये मध्यरात्री […]

अधिक वाचा..

ZP निवडणुक; कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद गावातील ग्रामस्थ पाणीप्रश्नावर आक्रमक…? 

शिरुर (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद या गावांची पाणी प्रश्न सोडविण्याची गॅरंटी कोणता नेता घेणार…? असा सवाल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. प्रत्येक निवडणुकीत तालुक्यातील बारा गावांचा पाणी प्रश्न, या प्रश्नावर परस्पर नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. लोकप्रतिनिधींकडून पाणी प्रश्न तडीस नेण्याच्या वल्गना केल्या आहेत. […]

अधिक वाचा..

कर्तव्याच्या वाटेवरचा ३० वर्षांचा देदीप्यमान प्रवास

कान्हूर मेसाईचे सुभेदार मनोजकुमार दळवी यांचा भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न कान्हूर मेसाई (सुनील जिते): कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील रहिवासी व भारतीय लष्करातील सुभेदार मनोजकुमार दळवी यांनी तीस वर्षांची प्रदीर्घ आणि निष्ठावान लष्करी सेवा पूर्ण करून नुकतीच निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या या गौरवपूर्ण सेवेच्या सन्मानार्थ रविवारी (ता. ११) गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक आणि सेवापूर्ती गौरव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळू माफियाचा हैदोस; शेतकऱ्याच्या कुटुंबासह ६ महिन्यांच्या गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला…

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी–लगडवाडी परिसरात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा उघडकीस आली असून, बेकायदेशीर वाळू वाहतुकीला विरोध केल्याच्या रागातून एका शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांवर अमानुष हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ६ महिन्यांची गरोदर महिला, वृद्ध आईसह चौघे जखमी झाले आहेत. लक्ष्मण मारुती कोळपे (वय ३९, रा. चिंचणी, ता. […]

अधिक वाचा..

आनोसेवाडीत ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी; वीजपुरवठ्याला फटका

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी (आनोसेवाडी) परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतात असलेल्या रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याने परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला असुन शेतकरी व नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी लकीचंद मोरसिंग राठोड (वय २७, तंत्रज्ञ, रांजणगाव गणपती शाखा, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्यांचा सुळसुळाट; रात्रगस्त वाढविण्याची मागणी 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून अज्ञात चोरट्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे. शिरुर शहरातील जोशीवाडी येथे पिकअप गाड्यांचे टायर, आनोसेवाडी, कळवंतवाडी, ट्रान्सफॉर्मरमधील तांब्या, घरफोड्या व किरकोळ चोरीच्या घटनांनी शिरुर तालुका अक्षरशः चोरट्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. बेट भागातील टाकळी हाजी परिसरात सलग चोऱ्यांच्या घटना उघडकीस येत असताना पोलीस […]

अधिक वाचा..

शिरुर येथील नानास्पॉटजवळ भीषण अपघात टळला; अज्ञात ट्रकच्या कटमुळे कार कंटेनरवर आदळली

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील नानास्पॉट परिसरात रविवार (दि ११) सायंकाळी घडलेल्या अपघातात मोठी दुर्घटना टळली. अज्ञात ट्रक चालकाने निष्काळजीपणे ओव्हरटेक करत चारचाकी गाडीला कट मारल्याने समोर उभ्या असलेल्या कंटेनरवर कार आदळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली, तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत किशोर गणेशलाल सरवैये (वय ६६, रा. बसैयेनगर, संभाजीनगर) […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रोहित्र चोरी सुरुच; प्रशासन झोपेत, शेतकरी उघड्यावर!

शिरुर (नितीन थोरात): शिरुर तालुक्यातील आमदाबाद परिसरात पुन्हा एकदा वीज रोहित्र चोरीचा प्रकार घडला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे. काही दिवसांपुर्वी याच गावात तीन रोहित्र फोडले गेले होते. तरीही एकही आरोपी जेरबंद न झाल्याने चोरट्यांचे धाडस वाढतच आहे. तालुक्यात रोहित्र चोरी संघटित टोळीमार्फत सुरु असलेले खुले आव्हान बनले आहे. ऐन शेतीच्या हंगामात […]

अधिक वाचा..