mandavgan-voting

वाघोलीला मतदानासाठी आलात तर रडस्तोर मारून पोलिसांच्या हवाली केले जाईल…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुरच्या पुर्व भागात वाघोली मतदार यादीतील दुबार नावांवरुन फ्लेक्सबाजी…

शिरूर (तेजस फडके) : पुणे महानगरपालिका हद्दीतील वाघोली येथील मतदार यादीत शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आढळून आल्याने निवडणुक व्यवस्थेतील गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभुमीवर मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, वडगाव रासाई, इनामगाव, निर्वी, बाभुळसर बुद्रुक, पिंपळसुटी, तांदळी आदी गावांमध्ये मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने आक्षेपार्ह, धमकीवजा मजकूर असलेले फ्लेक्स बोर्ड लावल्याने संपूर्ण शिरुरच्या पुर्व भागात गोंधळ उडाला आहे.

संबंधित फ्लेक्सवर “वाघोलीला मतदानासाठी आलात तर रडस्तोर मारून पोलिसांच्या हवाली केले जाईल” असा थेट इशारा देण्यात आल्याने दहशत निर्माण झाली असुन लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित इतक्या उघडपणे धमक्या दिल्या जात असताना प्रशासन मात्र गप्प का…? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गटात सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल?

View Results

Loading ... Loading ...

धक्कादायक बाब म्हणजे, शिरुरच्या पुर्व भागातील अनेक गावांतील मतदारांची नावे ग्रामपंचायत मतदार यादीत असतानाच पुणे महानगरपालिकेच्या वाघोली येथील यादीतही आढळून आली आहेत. सर्व मतदार याद्या ऑनलाईन व संगणकीकृत असताना अशी दुबार नावे वर्षानुवर्षे टिकून राहतात कशी, याबाबत निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर संशयाची सुई रोखली जात आहे. काही ठराविक मतदारांचीच नावे फ्लेक्सवर झळकल्याने संबंधित कुटुंबांमध्ये भीती, संताप आणि तीव्र नाराजी पसरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

दरम्यान, फ्लेक्स लावल्यानंतर काही वेळातच ते गावोगावी काढून टाकण्यात आले असले तरी या प्रकारामुळे वातावरण तापले असून निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. धमकी देणारे अज्ञात कोण…? त्यांना ही माहिती कोणी दिली? यामागे कोणाचा राजकीय डाव आहे…? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल?

View Results

Loading ... Loading ...

या प्रकरणी दुबार मतदार नावे तातडीने रद्द करावीत, दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, तसेच मागील निवडणुकांमध्ये दुबार नावांवर मतदान झाले असल्यास त्याची सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या या प्रकाराकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास शिरुरच्या पुर्व भागात निवडणूक वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मतदार कार्ड नसल्यास ‘या’ 12 पुराव्यांपैकी कोणताही एक दाखवून करा मतदान

ZP निवडणुक; कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद गावातील ग्रामस्थ पाणीप्रश्नावर आक्रमक…? 

१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजल

Video: शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात तृप्ती सरोदे यांना वाढता प्रतिसाद…

जिल्हा परिषद अपडेट! ज्योती मानसिंग पाचुंदकर यांची प्रचारात जोरदार आघाडी!

रांजणगाव गणपती ZP गटात राजकीय आरोप-प्रत्यारोप; शेखर पाचुंदकर यांची पोस्ट व्हायरल…