ऊसतोड कामगार न पुरवता केली चक्क १५ लाख ७० हजारांची फसवणुक

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): वडनेर (ता. शिरुर) येथील संपत बळवंत बो-हाडे यांना बाबुराव दगा सोनावणे, गोमा देवचंद्र तलवारे दोन्ही रा. कवळाने, ता. मालेगांव, जि. नाशिक, सोमा टुबडू सोनवणे, सुरेश कोंडाजी सोनावणे, रा. मु.पो. राजमाने, ता. मालेगांव, जि. नाशिक यांनी ऊसतोड कामगार पुरवतो अशी बतावणी करून त्यांना फिर्यादीने वेळोवेळी बॅकेमार्फत पैसे पाठवून सुद्धा कामगार न पुरवल्याने त्यांच्याविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की आरोपी 1) बाबुराव दगा सोनावणे, 2) गोमा देवचंद्र तलवारे दोन्ही रा. कवळाने, ता.मालेगांव, जि. नाशिक. 3) सोमा दुबळू सोनवणे, 4) सुरेश कोंडाजी सोनावणे, अ रा.मु.पो. राजमाने, ता. मालेगांव, जि. नाशिक. यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा टाकळी हाजी, व न्हावरा, (ता. शिरुर), जि. पुणे येथील संपत बोऱ्हाडे यांच्या अकाउंट नंबरवरुन सिंडीकेट बँक शाखा टिंगरी, ता. मालेगांव, जि. नाशिक. व एच.डी.एफ.सी. बँक शाखा ललिन, चे अकाउंट नंबर यावर दि.१२ मे २०२२ते रोजी ते दि. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पर्यंत वेळावेळी १४, २०,००० रु. तसेच रोख १, ५०, ००० रु. रोख असे एकूण १५, ७०, ०००/-रु. विश्वासाने घेवून संपत बोऱ्हाडे यांना उसतोड कामगार न पुरविता विश्वासघाताने आर्थिक फसवणूक केली असल्याने शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढिल तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करीत आहे.