पुण्यात महिलेची छेड काढल्याचा संशयावरून बेदम मारहाणीत ३५ वर्षीय युवकाचा खून

क्राईम महाराष्ट्र

पुणे: नात्यातील महिलेची छेड काढल्याने केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा खून झाला आहे. ही घटना चंदननगरमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत घडली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१), समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा (वय २१, दोघे रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक केली

साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे.पोलिसांच्या माहितीनुसार,आंबेडकर वसाहतीत आरोपी वाल्हेकर, शर्मा आणि जानराव राहायला आहेत. जानराव याने आरोपींच्या नात्यातील एका महिलेची छेड काढली होती. यावरुन त्यांच्यात वाद झाला. मंगळवारी (१२ ऑगस्ट) रात्री वाल्हेकर, शर्मा यांनी जानरावशी पुन्हा वाद घातला. महिलेची छेड का काढली? असा जाब विचारत जानरावला लाथाबुक्क्यांनी, तसेच हाॅकीस्टीकने बेदम मारहाण केली. मारहाणीत जानराव गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून पसार झाला.

गंभीर जानरावला रुग्णालयात नेले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, चंदननगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी धाव घेतली. फरार आरोपी वाल्हेकर, शर्माला रात्री उशीरा अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.