शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील पेपर विक्रते व आयडीबीआय बँकेचे कर्मचारी दत्तात्रय झळके (वय ५१) व त्यांची पत्नी सुवर्णा झळके (वय ४8) यांचा अहमदनगर जवळ अपघाती मृत्यू झाला आहे.
तळेगाव ढमढेरे येथील विविध वर्तमानपत्राचे विक्रते व IDBI बँकेचे कर्मचारी दत्तात्रय झळके हे संपत्नीक त्यांच्या मुलीच्या गावी असलेल्या कार्यक्रमा निमित्त अहमदनगरला जात असताना (दि.23) रोजी दुपारच्या सुमारास अहमदनगर येथील कल्याण फाटा कांदा मार्केट जवळ टँकरने धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. झळके पती पत्नीच्या मृत्यूची वार्ता समजताच तळेगाव ढमढेरे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.