crime

पाबळला जमिनीच्या वादातून मारहाण प्रकरणी दुसराही गुन्हा

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील माळतळे वस्ती येथे जमिनीच्या वादातून मारहाण प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असताना पुन्हा विरोधी गटाकडून 10 जणांवर परस्पर विरोधी तक्रार देण्यात आल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मिनिनाथ ज्ञानोबा पिंगळे, मंदा मिनिनाथ पिंगळे, मंगेश मिनिनाथ पिंगळे, अनुष्का मिनिनाथ पिंगळे, पोपट ज्ञानोबा पिंगळे, अजित पोपट पिंगळे, नंदा पोपट पिंगळे, अमित पोपट पिंगळे, कांताराम ज्ञानोबा पिंगळे, छाया कांताराम पिंगळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील माळतळे वस्ती येथे राहणाऱ्या मीनानाथ पिंगळे व त्यांचा चुलत भाऊ अरुण पिंगळे यांच्यात जमिनीच्या वाटपावरुन दावा सुरु असून ते न्यायालयात प्रलंबित असताना मारहाण झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मीनानाथ पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर रत्नमाला सोमनाथ पिंगळे (वय ४२) रा. माळतळे वस्ती पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन शिक्रापूर पोलिसांनी मिनिनाथ ज्ञानोबा पिंगळे, मंदा मिनिनाथ पिंगळे, मंगेश मिनिनाथ पिंगळे, अनुष्का मिनिनाथ पिंगळे, पोपट ज्ञानोबा पिंगळे, अजित पोपट पिंगळे, नंदा पोपट पिंगळे, अमित पोपट पिंगळे, कांताराम ज्ञानोबा पिंगळे, छाया कांताराम पिंगळे सर्व रा. रा. माळतळे वस्ती पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सुतार करत आहे.