न्हावरे (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन तब्बल ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्या–चांदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २१ सप्टेंबर रात्री ११ ते २२ सप्टेंबर पहाटे ५ च्या दरम्यान घडला.
याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे गौरव बापु पवार (वय २८, रा. चिंचणी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या राहत्या घराच्या किचन शेजारील खोलीचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश केला. घरातील स्टीलच्या डब्ब्यात ठेवलेले दागिने चोरट्यांनी लंपास केले. त्यामध्ये दीड तोळे वजनाचे, अंदाजे ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण (दोन वाट्या व काळे-सोन्याचे मणी असलेली दोन पदरी माळ) व ३ हजार रुपये किंमतीचे ५ भार वजनाचे चांदीचे पैजण असा मुद्देमाल चोरुन नेण्यात आला आहे.
असा एकूण ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे पवार यांनी पोलिसात नोंदवले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार प्रताप टेंगले हे करत आहेत.
Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?
Video; शिरुर तालुक्यात DJ च्या आवाजाने बैल उधळली; दोन लहान मुल जखमी
शिरुर तालुक्यात शेतातील वादातून महिलेस मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल