Crime

टेम्पो भाड्याने नेण्याच्या बहाण्याने व्यक्तींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे

क्राईम

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका टेम्पो चालकाचा टेम्पो कंपनीमध्ये लावण्यासाठी भाड्याने घेऊन जाण्याच्या बहाण्याने घेऊन जात टेम्पो चालकाची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रिजवान मोहम्मद पठाण या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौकात टेम्पोने वाहतूक करणारे आदेश पवित्रकार यांना रिजवान पठाण भेटला मला चाकण येथील कंपनीत टेम्पो लावायचा आहे तुझा टेम्पो दे मी त्याचे भाडे तुला देतो असे म्हणून आदेशचा टेम्पो घेतला. मात्र त्यावेळी टेम्पो बाबत करारपत्र न झाल्याने दुसऱ्या दिवशी करु असे म्हणून आदेश यांचा एम एच १२ एस एक्स ७४८४ हा टेम्पो घेऊन गेला.

unique international school
unique international school

मात्र त्यानंतर पुन्हा शिक्रापूर येथे येण्यास टाळाटाळ केली. तसेच फोनवर दमदाटी केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने याबाबत आदेश गणेश पवित्रकार (वय २०) रा. बकोरी फाटा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. जुनी शहर अकोला ता. अकोला जि. अकोला यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी रिजवान मोहम्मद पठाण रा. बीड ता. बीड जि. बीड याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बापूसाहेब हडागळे हे करत आहे.