सी.एस.आर फंडातून रक्कम मिळवून देतो म्हणत केली आर्थिक फसवणुक…

क्राईम

शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): शेततळ्याच्या कामाचे पैसे बेंगलोर येथिल कंपनीमार्फत मिळवून देतो. त्यापोटी दहा टक्के रक्कम कंपनीकडे भरा असा विश्वास देत तब्बल २, ३५, ००० (अक्षरी 2 लाख 35 हजार रुपये) घेऊन कुठलेही पैसे न देता आर्थिक फसवणुक केल्याने फिर्यादी संतोष हरिश्चंद्र चव्हाण, आरोपी नवनाथ शिवाजी बारस्कर रा. लाटेआळी शिरुर याच्यावर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, शिरुर शहरातील लाटेआळी येथील नवनाथ शिवाजी बारस्कर यांनी शेततळ्याचे कामाचे पैसे बेंगलोर ह्या कंपनी पर्फत सी .एस. आर या फंडातून मिळवून देतो त्याबद्दल तुमच्या कामाच्या रक्कमेचे 10 टक्के रक्कम ही कंपनीकडे भरा, असे विश्वास देऊन त्यांनी फिर्यादीच्या कॅनरा बँकेचा अकाउंट नंबर 2582201001185 यावर स्टेट बँक ऑफ इंडिया मधील फिर्यादीचा अकाउंट नंबर 30285363501 वरून तसेच पुणे जिल्हा मध्ये सहकारी बँकेचे अकाउंट 137600000002 यावरून एकुन 2,35,000 अक्षरी दोन लाख 35 हजार रुपये घेऊन फिर्यादीला कोणत्याही कंपनीकडून सी.एस.आर फंडातून रक्कम मिळून न देता विश्वासघाताने त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहे.

नागरीकांनी कुठल्याही प्रलोभनाला, आमिषाला बळी न पडता व्यवस्थित चौकशी करावी व मगच पुढील आर्थिक व्यवहार करावा. सध्या मोबाईलवर फसवणुकीचे मॅसेज, फोन येत असून आपल्या मोबाईलवर येणारा ओटीपी क्रमांक कुणालाही देवू नये. अन्यथा आपले खाते रिकामे होण्यास वेळ लागणार नाही.

सुनिल उगले ( पो. उपनिरीक्षक, शिरूर )