body

सणसवाडीत विजेच्या धक्क्याने विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील खंडोबा आळी परिसरात कंत्राटी पद्धतीने विद्युत वितरण विभागाची कामे करणाऱ्या धनंजय बापुसो दरेकर या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील धनंजय दरेकर हा कंत्राटी पद्धतीने विद्युत विभागाची कामे करत होता. नेहमीप्रमाणे धनंजय हा गावातील स्मशानभूमी जवळ असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मर मध्ये फ्यूज टाकण्यासाठी गेला होता. फ्यूज टाकत असताना अचानक त्याला विजेचा धक्का लागून तो जमिनीवर कोसळला यावेळी शेजारी नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी धनंजय बापुसो दरेकर (वय ५४) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे याचाउपचारा पूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याबाबत रामदास बबन दरेकर (वय ३४) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश करपे करत आहे.