Crime

सणसवाडीत महिलेकडून कंपनीसाठी वीजचोरी: गुन्हे दाखल 

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीत महिलेकडून कंपनीसाठी वीजचोरी झाल्याची घटना समोर आली असल्याने विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रुपाली अशोक गरुड या महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे रुपाली गरुड कंपनी असून सदर कंपनीमध्ये विजेच्या मीटर मधून त्यांनी चोरून वीज वापर सुरु केलेला होता. विद्युत वितरण विभागाचे वीजचोरी शोध मोहिमेचे पथक औद्योगिक वसाहतीतील विजेच्या चोरीची पाहणी करत असताना त्यांना रुपाली गरुड यांच्या कंपनीमध्ये सुरु असलेला विजेचा वापर चोरुन होत असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत दिपक श्रीमंतराव कोथले (वय ४९) रा. सायली सुगंध सोसायटी रेल्वे पुलाजवळ ता. बारामती जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी रुपाली अशोक गरुड रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे या महिलेच्या विरोधात वीजचोरी प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहे.

रुपाली गरुड या महिलेवर यापूर्वी देखील फसवणुकीचा गुन्हा…

रुपाली गरुड या महिलेवर यापूर्वी देखील टेम्पोचे बनावट कागदपत्रे बनवून सदर टेम्पो एका इसमाला विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.