शिरुर शहरात सोनसाखळी चोऱ्या थांबेना, महीनाभरातील तिसरी घटना

क्राईम

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात गेल्या महीनाभरापासून सोनसाखळी चोरांनी बाबुरावनगर, एसटी स्टॅण्ड, पाबळफाटा परीसरात धुमाकूळ घातला असून महीनाभरातील ही तिसरी घटना असून सोनसाखळी चोरांना गजाआड करण्यात शिरुर पोलिसांना अपयश येत आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २९) जानेवारी रोजी सायंकाळी ०५ वाजण्याच्या सुमारास मौजे शिरुर गावचे हद्दीत अहमदनगर – पुणे हायवेच्या सर्विस रोडवर महालक्ष्मी मार्बल दुकाना जवळून शारदा आढाव व तिची मुलगी स्कुटी नं. एम. एच १६ बी. के .७९३६ या गाडी वरुन जात असतांना स्कूटीचे पाठीमागुन एक अनोळखी व्यक्ती त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टा असलेली होंडा शाईन मोटार सायकल वरुन येऊन अचानक त्याने शारदा आढाव हीच्या गळयातील एक मोठे मंगळसुत्र त्यातील चैन 2 तोळ्याची त्यामधील अर्धभाग त्याचे वजन अंदाजे एक तोळयाची चैन जबरदस्तीने ओढुन नेत पळून गेला आहे. म्हणुन त्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये शारदा आढाव यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.