तळेगाव ढमढेरेत तीन दारु अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील 3 वेगवेगळ्या ठिकाणी दारु अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकत दारुच्या बाटल्या जप्त करत दारु विक्री करणाऱ्या स्वप्नील कैलास गायकवाड, निलेश लहानू तांबे बाळू रघुनाथ घुमे या तिघांवर गुन्हे दाखल केले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील काही ठिकाणी दारु विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार किशोर तेलंग, पोलीस नाईक विकास पाटील, पोलीस शिपाई जयदीप देवकर, भास्कर बुधवंत यांनी तळेगाव ढमढेरे येथील आण्णासाहेब हॉटेल च्या पाठीमागे छापा टाकत स्वप्नील कैलास गायकवाड याला दारुच्या बाटल्यांसह ताब्यात घेतले. त्यानंतर गिताई हॉटेल जवळ छापा टाकत निलेश लहानू तांबे याला दारुच्या बाटल्यांसह ताब्यात घेतले तसेच तळेगाव ढमढेरे सणसवाडी रोड लगत छापा टाकत बाळू रघुनाथ घुमे याला दारुच्या बाटल्यांसह ताब्यात घेतले. पोलिसांनी तीनही ठिकाणी मिळून आलेल्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या.

याबाबत पोलीस नाईक विकास जालिंदर पाटील व भास्कर महादेव बुधवंत यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी स्वप्नील कैलास गायकवाड (वय ३०) रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे, निलेश लहानू तांबे (वय ३४) रा. वरुडे (ता. शिरुर) जि. पुणे, बाळू रघुनाथ घुमे (वय ४४) रा. भोईआळी तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.