Shikrapur Police Station

पुणे नगर महामार्गवरुन रांजणगाव MIDC त येणाऱ्या लाखोंच्या मालाचा अपहार

क्राईम

शिक्रापूर (शेरखान खान): सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन रांजणगाव MIDC येथील कंपनीत नेण्यात येणारा 15 लाखांचा मुद्देमाल एका टेम्पोतून दुसऱ्या टेम्पोमध्ये भरुन घेत पोबारा करुन तब्बल 15 लाखांच्या मालाचा अपहार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे योगेश नामक व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील एका कंपनीतून काही माल भरुन तो माल रांजणगाव MIDC येथील करारो इंडिया कंपनीमध्ये घेऊन जाण्यासाठीचे टेम्पो भाडे योगेश नावाच्या व्यक्तीने कृष्णा तांदळे यांना दिले होते. तांदळे यांनी त्यांचा एम एच २३ ए यु ३८३८ या टेम्पो मध्ये कोल्हापूर येथील कंपनीतून माल भरुन आणला. (दि.14) ऑगस्ट रोजी तांदळे टेम्पो घेऊन सणसवाडी येथे आलेले असताना तांदळे यांना टेम्पो भाडे देणाऱ्या योगेशने तांदळे यांना फोन करुन रांजणगाव MIDC येथील कंपनी (दि.15) ऑगस्ट मुळे बंद आहे.

तुमच्याकडे दुसरा टेम्पो पाठवतो त्या टेम्पोत माल टाकून द्या असे म्हणाला त्यामुळे तांदळे यांनी योगेश याने पाठवलेल्या एम एच ११ सि एच १००३ या टेम्पो मध्ये माल टाकून दिला. त्यानंतर रांजणगाव येथील कंपनीत माल न आल्याने त्यांनी कोल्हापूर येथील कंपनीला संपर्क केल्याने कोल्हापूर येथील कंपनीने कृष्णा तांदळे याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी योगेश याने सदर टेम्पोतील मालाचा अपहार केल्याचे निदर्शनास आले.

याबाबत कृष्णा मच्छिंद्र तांदळे (वय २७) रा. पेरणेफाटा ता. हवेली जि. पुणे मूळ रा. अमळनेर ता. पाटोदा जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी योगेश (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्या विरुद्ध अपहर प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व अतुल पखाले हे करत आहे.