शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले दोन भाऊ काही कारणास्तव एकमेकांच्या जीवावर उठले आहे. धारदार कोयत्याच्या सहाय्याने धाक दाखवत भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने भावाने भिती पोटी शिरूर पोलिस स्टेशन गाठून पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गोलेगाव (ता. शिरूर) येथील श्रीकांत बबन भोगावडे (वय 38) यांना त्यांचा सख्का भाऊ संदिप बबन भोगावाडे याने अज्ञात कारणावरून गोलेगाव येथे शिविगाळ केली आहे. त्यानंतर पुन्हा भाऊ संदिप याने गुजर मळा शिरूर येथील निर्माण प्राईड येथे येत श्रीकांत यांच्या फ्लॅटच्या समोर उस तोडायचा धारधार कोयता घेवुन आरडोओरडा करून श्रीकांत यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देवुन त्यांच्या घराच्या समोर दहशत करत होता. त्यामुळे श्रीकांत याने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये सख्या भावावर आर्म ऍक्ट 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार विनोद मोरे हे करत आहे.

जमिनीच्या, प्रॉप्रटीच्या वादातून भावाभावांमध्ये मोठे वाद निर्माण होत असून हे वाद गावागावातच मिटले गेले पाहीजे, अन्यथा भाऊ भावाचा पक्का वैरी झाल्याशिवाय राहणार नाही.
