मुजोर कंपनी व प्रशासनाचा निषेध करुन शिरुर तहसिल कार्यालयासमोर केले सामूहिक मुंडण

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसाठी कैलास वसंत कर्डिले हे (दि. १३) जुलै रोजी पासून उपोषणास बसले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासनाने व आय. एफ. बी कंपनीने दखल न घेतल्यामुळे निषेध म्हणून शिरुर तहसिल कार्यालयासमोर तरुणांनी सामुहिक मुंडन केले आहे. यावेळी मोठया प्रमाणात महीला वर्ग हजर होता.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे रांजणगाव टप्पा कं. ३ मध्ये आय एफ बी रेफ्रिजरेशन लि. कंपनीचे काम झालेले असून स्थानिक प्रकल्पबाधितांना प्राधान्याने सदर कंपनी कामे देत नसल्याने कैलास वसंत कर्डिले यांचे (दि. १३) जुलै रोजीपासून उपोषण आंदोलन चालू केले आहे.

प्रशासनाकडून उपोषण थांबविण्याकरिता धाक, दडपण आणण्याचा सतत प्रयत्न चालू आहे. परंतू, आंदोलक, ग्रामस्थ व प्रकल्पबाधित यांच्या मागण्या या कायदेशिर स्वरूपाच्या असतानाही सदर मागण्यांबाबत कोणताही विचार केला जात नसल्याने तहसिल कार्यालयासमोर सामुहीक मुंडण करून जाहीर निषेध नोंदविला आहे. यावेळी विकास सरोदे, मयुर विलास सरोदे व आंदोलकांनी सामूहिक मुंडण केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर, निलेश वाळुंज, ॲड. उदय सरोदे, शशिकांत निरवने, दीपक सरोदे, अशाल शेळके, दत्तात्रय कुंडलिक, विभाग प्रमुख पंकज शेळके,रंगनाथ गायकवाड, राहुल सरोदे, अजय सरोदे, अभिजीत घावटे, निशांत सरोदे, धनंजय घावटे, रोहन सरोदे, अक्षय कर्डीले, तृप्ती सरोदे, आनिता घावटे, निलम सरोदे, भाग्यश्री कर्डिले, शोभा कर्डिले, कांता निरवणे, जिजाबाई सरोदे, अंजली सांगळे, वैशाली सरोदे, दिपाली सरोदे, रुक्मिणी गायकवाड, सुरेखा घावटे, श्रुतिका निरवने, शिल्पा घावटे, लीलाबाई कुंडलिक, ललिता सरोदे, दिपाली सरोदे, वत्सला घावटे, संगीता घावटे, शकुंतला इसवे, साधना बाराते, मंगल सरोदे, सुरेखा निरवणे, हरणाबाई गायकवाड, उषा निरवणे, योगिता कर्डिले, सुवर्णा घावटे मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.