शिरुर शहरातुन चोरट्यानी काय चोरले बघाच…

क्राईम

शिरुर (अरुणकुमार मोटे): पैसे कमविण्यासाठी चोरटे कशाची चोरी करेल याचा काही नेम नाही. सोन्या – नाण्याच्या मौल्यवान वस्तु ऐवजी चोर आता शेतकऱ्यांचे शेतमाल, कांदे, विद्युत मोटारी, जनावरे चोरीकडे वळाले आहे. आधीच तीन महीने जोरदार अतीवृष्टी, त्यात शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना चोरट्यांनी आता शेतकऱ्यांनाच आपले लक्ष केले आहे. अशीच एक घटना शिरुर शहरात घडली असून मुस्तकीन साजुद्दीन कुरेशी रा. कुंभार आळी, शिरुर यांच्या वेगवेगवेगळया वयाच्या व वेगवेगळ्या रंगाच्या तब्बल ११ शेळया अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २३) रोजी, अंदाजे सकाळी १० वाजण्याच्या ते ६ वाजण्याच्या दरम्यान मौजे शिरुर गावचे हद्दीतील आला हजरत मोकळया मैदानात मुस्तकीन कुरेशी याच्या मालकीच्या वेगवेगळ्या रंगाच्या व वेगवेगळया वयाच्या एकुन ११ शेळया चरण्यासाठी सोडलेल्या असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुददाम लबाडीने स्वत:च्या आर्थिक फायदयाकरीता शेळया चोरून नेल्या आहेत .

याबाबत शिरुर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुस्तफिन कुरेशी यांनी कायदेशिर फिर्याद दिली असून पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक गवळी हे करत आहे.