Shirur Robbery

शिरूर तालुक्यात निवृत्त पोलिसाच्या घरी चोरट्यांचा डल्ला…

क्राईम

शिक्रापूरः करंदी (ता. शिरुर) येथील जातेगाव रोड लगत राहणारे सेवानिवृत्त पोलिस दिवाळी मुळे गावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा तब्बल एक लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील सेवानिवृत्त पोलिस असलेले रमेश कोलते हे दिवाळी मुळे १२ ऑक्टोबर रोजी घराला कुलूप लावून गावी गेले होते. २० ऑक्टोबर रोजी कोलते यांच्या घराचे कुलूप तोडलेले तसेच दरवाजा उघडा असल्याचे शेजारील नागरिकांना दिसले त्यामुळे त्यांनी कोलते यांना फोन करुन माहिती दिली. कोलते तातडीने घरी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले तसेच घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे तसेच कपाट उघडे असल्याचे दिसले, त्यामुळे कोलते यांनी कपाटाची तपासणी केली.

कपाटातील तीस हजार रुपये रोख रक्कम व तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच काही चांदीचे दागिने चोरीला असा तब्बल एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले.

याबाबत रमेश गंगाराम कोलते वय ६५ वर्षे ता. जातेगाव रोड करंदी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.