Shirur Robbery

शिरूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेला मारहाण अन्…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरालगत असणाऱ्या तर्डोबाच्या वाडीतील कलाबाई राक्षे या महिलेच्या घरी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकुळ घालत घराचा दरवाजा तोडून या महिलेच्या गळयातील सोन्याचे दागिणे चोरून नेऊन तिला मारहाण केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी (ता. २०) मध्यरात्री १ : ३० वा. सुमारास कलाबाई राक्षे या महिलेच्या घराचा मुख्य दाराचा कडी कोंडा तोडून चोरटयांनी तिच्या घरात प्रवेश केला. महिलेच्या अंगावरील एक तोळ्याची पान पोत व अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी प्रती तोळा ५०, ००० रू. प्रमाणे व कपाटातील ६००० रू. असा एकूण ८१, ००० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून घेऊन जात असताना कलाबाई राक्षे या त्यांचा मागे रूमच्या बाहेर आल्या असता एका चोरट्याने त्यांचा केसाला धरून ओढले. तेव्हा ती रूमच्या दारात पडली. तिच्या कंबरेला मुक्का मार लागला आहे.

दुसरी घटना…
तर्डोबाच्या वाडीतील देविदास बाळासाहेब कर्डिले हे घरी आले असता त्या दरम्यान त्यांचे घरातून एक रेबनचा गॉगल किंमत ३०००रु. तसेच एक स्मार्ट वॉच किंमत ५, ०००/- रु. व घरात अडकवून ठेवलेल्या पॅन्टच्या खिशातील २००० रू. व एक स्काय ब्ल्यु टि शर्ट किंमत २००- रू. असे चोरीस गेले आहेत. असा एकूण देविदास यांचा १०, २०० रूपयांचा माल चोरीस गेला आहे. कलाबाई राक्षे व देविदास कर्डिले यांचे मिळून एकत्रीत एकुण अंदाजे ९१, २०० रूपयाचा माल चोरीस गेला आहे.

या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करीत आहे. शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, कायदा सुव्यवस्था पुर्णपणे धोक्यात आली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.