शिरूर तालुक्यातील रहस्यमय मृत्यू झालेल्या तीन अनोळखी प्रेतांचे गुढ कायम…

क्राईम

शिरूर: शिरूर तालुक्यातील रहस्यमय मृत्यू झालेल्या तीन अनोळखी प्रेतांचे शिरूर पोलिसांना अद्याप गुढ उकलेले नाही. शिरूर पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे.

एक वर्षापुर्वी मलठण येथील शिंदेवाडीच्या दर्गामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झालेले प्रेत मिळाले होते. परंतु, अदयाप ही व्यक्ती कोण व तिचा मृत्यू कसा झाला याची अदयाप शिरूर पोलिसांकडून उकल होऊ शकली नाही. तसेच आठ दिवसांपुर्वी शिरूर ग्रामीण रुग्णालय परीसरात असेच एक अनोळखी प्रेत मिळून आले होते. त्याबाबत पुढे शोध लागलेला दिसून येत नाही. नुकतेच न्हावरा फाटा येथील बोऱ्हाडे मळा येथे निलेश हजारे यांच्या मोकळया जागेमध्ये एक बेवारस प्रेत मिळून आले. त्याच्या हातावर जखमा होत्या. त्याचाही अपघाताने मृत्यू की अन्य कारणाने मृत्यू याची उकल शिरुर पोलिसांकडून होऊ शकली नाही.

एकूणच या तीनही रहस्यमय मृत्यू झालेल्या प्रेंताचे गुढ ऊकलण्यास शिरूर पोलिसांना अद्याप यश आले नाही. सध्या विद्युत मोटार चोर, सोन साखळी चोर, खुनाचा प्रयत्न, घरफोडी व त्याचबरोबर अनोळखी प्रेतांचे गुढ या सर्व तपासामध्ये शिरूर पोलिस स्टेशनला अपयश आले आहे. हद्द मोठी, अपुरा कर्मचारी वर्ग ही या पाठीमागची कारणे असून आधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. नुकताच शिरूर पोलिस स्टेशनच्या लॉकअपमधून एक आरोपी कौले उचकटून फरार झाला आहे. तो अदयाप मिळालेला नाही. त्यामुळे पोलिस नैराश्यग्रस्त झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच डागडुजी करणे महत्वाचे होते.