शिरुर परीसरात सोनसाखळी चोरांचा हैदोस, दोन महीन्यातील चौथी घटना 

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर परिसरात सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला असून दोन महीन्यात ४ महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. शिरुरच्या बोऱ्हाडे मळा येथील शालन रावसाहेब बोऱ्हाडे ही महिला आपल्या नातीसह रिक्षातून घरी जात असताना तीन अनोळखी व्यक्तीनी तिच्या गळ्यातील सोन्याचे अंदाजे ८५, ०००रु. दागिणे ओरबाडून चोरून नेले आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार (दि. 4) फेब्रुवारी रोजी सकाळी ७: ४५ वाजल्याच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दीतील बो-होळेमळा येथे एस. एस. हॉटेल समोरील रोडवर शालन बोऱ्हाडे ह्या त्यांची नात शख्या हीस रिक्षामध्ये बसवून घरी जात असताना काळ्या रंगाचे पल्सर मोटार सायकलवर आलेल्या २५ते ३० वयोगटातील तीन अनोळखी व्यक्तीनी ‘येथे शिंदे कोठे राहतात’ असे विचारले. तेव्हा तीने त्यांना मला माहीत नाही असे सांगीतले असता त्या व्यक्तीने तिच्या डाव्या बाजुस बोट केल्यावर महीलेने त्या दिशेने पाहीले असता तिच्या गळ्यातील हाफ गठण व पानपोत जबरदस्तीने ओढुन तोडुन घेउन त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलवर पळून गेले आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये अनोळखी विरूद्धगुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलिस उपनिरिक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.

शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत सोनसाखळी चोरांबरोबरच दुचाकी, फोर व्हिलर गाडया, शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल, घरफोड्या, खुण ह्या घटना वारंवार होत असून शिरूर पोलिसांना या चोरांना पकडणे कठिण बनले आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून ते चोऱ्या करत असून पोलिसांपुढे चोरटयांनी मोठे आव्हाण निर्माण केले आहे. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचा कार्यकाळ संपत आला असून शिरूरला दबंग आधिकाऱ्याची गरज असल्याची चर्चा नागरीक करत आहे.