shivnagar-school

शिवनगर शाळेत ‘भविष्यवेधी व्यवसाय’ व्याख्यानाचे आयोजन…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पुणेच्या सीएसटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देशपांडे यांनी शिवनगर (ता. शिरूर) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्योंगाविषयी माहिती दिली.

स्वंयरोजगार, व्यवसाय, उद्योग अशा विविध क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यांवर आधारीत व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. भविष्यातील नोकरी, व्यवसायातील आव्हाने, कृत्रिम बुद्धीमत्ता, त्यासाठी प्राथमिक स्तरापासुन भविष्यवेधी शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि भविष्यातील विविध संधीविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

शिवनगर शाळेतील संगणक लॅब, अँलेक्सा, किओस्क, रिमोट अन्सरिंग, ऑनलाईन अटेंडन्स, ई-लायब्ररी, इंट्राअँक्टीव बोर्ड, प्रोजेक्टर इत्यादी डिजिटल साधनांचे, शिक्षणात होत असलेल्या वापराचे त्यांनी कौतुक केले.

सीएसटी कंपनीतर्फे इलेक्ट्रीक किट, कार्पेंटर किट, प्लंबिंग किट, कार्यनुभव किट, मेहंदी-रांगोळी किट आणि चित्रकला किट इत्यादी कौशल्य विकास किट शाळेला भेट देण्यात आले. यावेळी प्रज्ञा देशपांडे, मनोज शितोळे, आप्पा खांडेकर इत्यादी उपस्थित होते. या व्याख्यानाचा शिक्षक, विद्यार्थ्यांना खूप फायदा झाल्याचे मुख्याध्यापक बाळासाहेब घोडे यांनी सांगितले. सहशिक्षक राजेंद्र नरसाळे यांनी आभार मानले.

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू…

शिरूर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

शिरुर तालुक्यात जुन्या वादातून एकास मारहाण; उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू

शिरूर तालुक्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण…

शिरूर तहसिल कार्यालयात चक्क रात्रीस खेळ चाले…