शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील यात्रेमध्ये आलेल्या एका महिलेचा मोबाईल तर एका महिलेच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
धामारी (ता. शिरुर) येथील यात्रेमध्ये अनिता जाधव व लक्ष्मी पवार हा दोघी बहिणी आलेल्या होत्या, देवदर्शन करुन यात्रेतील गर्दीतून जात असताना काही वेळाने अनिता यांच्या जवळील मोबाईल गायब असल्याचे तसेच लक्ष्मी यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचा सोन्याचा हार देखील गायब असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे यात्रेत कोणीतरी आपले दागिने व मोबाईल चोरल्याचे लक्षात आल्याने याबाबत अनिता मुकुंद जाधव (वय ५९) रा. काळा चौकी मंदार हौसिंग सोसायटी मुंबई यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश सुतार हे करत आहे.