चेन्नईः हेल्मेटमध्ये एका छोट्या आकाराच्या किंग कोब्रा प्रजातीच्या साप बसला होता. दुचाकी स्वाराने हेल्मेट घातले आणि प्रवास सुरू केला. पण, सापाने दंश केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती ग्लानी येऊन तिच्या दुचाकीवर मानखाली घालून बसल्यासारखी दिसत आहे. दुचाकीस्वाराला इतर लोक शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण, संबंधित व्यक्ती स्कूटरवरुन उठत नाही तर त्याला बेशुद्धावस्थेत त्याला उचून घेतात आणि ओमनी कारच्या रुग्णवाहिकेमधून घेऊन जाताना दिसतात.
मनोज शर्मा नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना, “हा दक्षिण भारतामधील व्हिडीओ आहे. कोब्रा सापाचे पिल्लू हेल्मेटमध्ये लपले होते. त्याने चालकाच्या डोक्यावर दंश केला. हेल्मेटमध्ये लपलेलं कोब्रा सापाचं पिल्लूही दाखवण्यात आले आहे. सापाची पिल्लं कशाप्रकारे हेल्मेटमध्ये लपतात हे यामधून दाखवण्यात आलं आहे. जेव्हा तुम्ही हेल्मेट घालता तेव्हा एकदा त्यावर थाप मारुन आणि ते झटकून घ्या,” असा सल्लाही मनोज शर्मा यांनी दिला आहे.
दरम्यान, हेल्मेट किंवा दुचाकीच्या चाकांबरोबरच हॅण्डल किंवा अन्य भागात आश्रय घेणारे हे साप दिसायला छोटे असले तरी अत्यंत विषारी असतात. म्हणूनच हेल्मेट, बुट घालताना ते एकदा तपासून घेतले पाहिजेत.
यह दक्षिण भारत का वीडियो है एक कोबरा का बच्चा हेलमेट में छुपा हुआ था और व्यक्ति के सर में काट लिया !!
जब भी आप हेलमेट पहने तो एक बार हेलमेट को ठोक कर झाड़ कर ही पहने !!#ViralVideos #Helmet #Viral pic.twitter.com/8PnRKdMXjo— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) December 24, 2024
बापरे! किंग कोब्राने युवकाला केला दंश अन् जीव गेला सापाचा…
साप चावला अन् अंत्यसंस्कारावेळी उठून उभा राहिला…
थरारक Video: शौचालयास बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला…
Video: दारूचे व्यसन सोडवायला गेला अन् मिळाला खतरनाक ‘प्रसाद’…
Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…
Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…