ramling

श्री क्षेत्र रामलिंग…

थेट गावातून

प्रभू श्री रामचंद्र यांना ज्या वेळी वनवासाला पाठवले त्या वेळचा रामलिंगचा इतिहास आहे. श्री रामचंद्र ज्या वेळी वनवासाला होते त्यावेळी त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. दिवसभर पायी चालायचे व रात्री मुक्काम करायचा. रात्री जेथे मुक्काम करायचा तेथे वाळूची पिंड बनवायची व सकाळी सूर्योदयाच्या अगोदर ती पिंड शेजारील नदीत विसर्जित करायची, असा दिनक्रम ठरलेला.

नित्यक्रमाणे आत्ता जेथे रामलिंग क्षेत्र आहे तेथे रामचंद्राने रात्री मुक्कामाच्या वेळी पिंड बनवली होती. श्री राम जेथे मुक्कामाला थांबले होते तेथे सुर नावाच्या ऋषींचा आश्रम होता. ऋषीबरोबर गाठभेट झाल्याने संपूर्ण रात्र गप्पा मारण्यात गेली व नेमकी सूर्योदयाच्या वेळेस श्री रामचंद्र यांना गाढ झोप लागली. सूर्योदयाच्या अगोदरचा पिंड विसर्जनाचा दिनक्रम राहून गेला. नियमाप्रमाणे पिंड सूर्योदयाच्या अगोदर विसर्जित करायची असल्याने श्री राम यांनी सुर्योदायानंतर ती विसर्जित केली नाही. ठरल्याप्रमाणे पुढील प्रवासास ते निघाले. तयार केलेल्या पिंडीची व्यवस्था सुर ऋषींकडे सोपवली, म्हणून त्या पिंडीस रामलिंग असे नाव पडले. पुढे त्याचेच रामलिंग मंदिर झाले. या मंदिरामुळे पुढे हे क्षेत्र श्री क्षेत्र रामलिंग या नावाने नावरुपास आले.

प्राचीन काळी रुर नावाच्या राक्षसाने शंकराची उपासना करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते. शंकर प्रसन्न झाल्यामुळे रुर राक्षसाने धुमाकूळ घालायला सुरवात केली. रुर राक्षसाच्या त्रासाला कंटाळून लोकांनी देवाचा धावा केला. या राक्षसामुळे देवांना सुद्धा चिंता पडली. त्यातच भर नारदमुनिंनी रुर राक्षसाला कळ लावली. नारदमुनींनी या रुर राक्षसाची वारेमाप स्तुति केली व त्या राक्षसाला देवांचे राज्य घेण्यास सांगितले. नंतर त्याने देवांवर स्वारी करायला सुरुवात केली. रुर राक्षसाने देवांना फार त्रास दिला. मग सर्व देवदेवता घाबरून देवाधिदेव महादेवाकडे गेले. देवांनी शंकराला प्रसन्न केले. परंतु शंकरापुढे एक अडचण होती. रुर राक्षस हा शंकराचा भक्त होता, यामुळे शंकर आपल्या भक्तावर शस्त्र उचलू शकत नव्हते. यातून शंकराने एक मार्ग काढला, शंकराच्या जटेतून एक शांती नावाची देवी निघाली होती. सर्व देवतांनी तिला प्रसन्न केली व शंकराच्या आज्ञेवरून शांती नावाच्या देवीने बाकी देवांना दिलासा दिला व रुर राक्षसास मारण्याचे वाचन दिले. शांतीच्या डोळ्यातून ज्वालाच-ज्वाला बाहेर पडू लागल्या व तोंडातून हजारो डाकिण्या बाहेर पडल्या. रुर राक्षसाचा पराभव झाला. रुर राक्षस पळून गेला. देवीने त्याचा पाठलाग केला व सडपा जेथे शिरुर गाव आहे या गावाच्या वेशीवर राक्षसाला गाठले व त्याचा वध केला. म्हणून त्या गावास शिवरूर असे नाव पडले व पुढे शिवरूरचेच शिरुर असे नाव झाले, असे सांगितले जाते.

रामलिंग क्षेत्र हे शिरूर शहरापासून पाबळ रस्त्यावर ३ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी एसटी सेवा व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. शिवाय, श्रावणी सोमवारी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.