Shekhar Pachundkar

माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांची मुलाखत…

मुलाखत

रांजणगाव गणपतीः कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड तसेच रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध करून देऊ शकलो. कारण राज्याचे गृहमंत्री आणि शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. अशी भावना माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांची “शिरुर तालुका डॉट कॉम” चे संपादक तेजस फडके यांनी नुकतीच मुलाखत घेतली. त्या मुलाखती दरम्यान अनेक मुद्यांवर शेखर पाचुंदकर यांनी दिलखुलासपणे आपले मत व्यक्त केले.