शिरुर तालुक्यात 17 डिसेंबर रोजी सहावी ‘रांजणगाव मॅरेथॉन 2023’ स्पर्धा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आर एम धारीवाल फाउंडेशन तसेच महागणपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 17 डिसेंबर 2023 रोजी “रांजणगाव मॅरेथॉन 2023” हि स्पर्धा संपन्न होणार आहेत. आर एम धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभा धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा संपन्न होणार असल्याची माहिती महागणपती फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पाचुंदकर यांनी सांगितले.

या स्पर्धेत 3 किमी व 5 किमी (मुले – मुली) असे 4 गट असणार आहे. तसेच स्पर्धेत 1 लाख रुपयांची रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार असुन या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टि शर्ट, मेडल आणि चेष्ट नंबर देण्यात येणार आहे. वय वर्षे 10 वर्षाच्या वरील सर्वांनाच यामध्ये सहभागी होता येणार आहे.

 

‘रांजणगाव मॅरेथॉन’ स्पर्धेचे हे सहावे वर्ष असुन प्रत्येक वर्षी या स्पर्धेला खेळाडूंचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षीही मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामुळे ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावे असे आयोजकांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 9595689696 आणि 9657663383 या नंबरवर संपर्क करावा तसेच Online रजिस्ट्रेशन साठी https://www.townscript.com/e/ranjangaon-marathon-2023-310411 या लिंकवर जाऊन फार्म भरावा किंवा रांजणगाव गणपती व शिरूर येथे ऑफलाईन फार्म भरणे चालू आहे. त्यासाठी वरील नंबरवर संपर्क करावा.