शिरुर पोलिस स्टेशन, भरोसा सेल आणि शिरुर महिला दक्षता समितीच्या वतीने स्नेह मेळावा व हळदीकुंकू समारंभ संपन्न 

मुख्य बातम्या

शिरुर: आजकाल मोबाईलच्या जमान्यात महिलांनी मुलींना मोबाईल हातात देताना खुप काळजी घेणं गरजेचं असुन अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे आपली ऑनलाईन फसवणूक होत असते असे मत शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चराफले यांनी व्यक्त केले. शिरुर येथील जुन्या नगर पालिकेच्या कार्यालयात प्रथमच शिरुर पोलिस स्टेशन, भरोसा सेल आणि शिरुर महिला दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व महिलांसाठी स्नेहमेळावा तसेच हळदीकुंकू समारंभानिमित्त कौटुंबिक हिंसाचार आणि महिला विषयक कायदे याबाबत मार्गदर्शन ठेवण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. यावेळी बोलताना शिरुर पोलिस स्टेशन महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या महिलांचा स्नेह मेळावा आयोजित करणे हे फक्त एक निमित्त असते. यामुळे सर्व महिला एकत्रित येतात आणि यातूनच नवीन गोष्टी शिकायला मिळतात. महिलांचे कायदे याची माहिती मिळते. दररोज घरातील जबाबदारी पेलवत असताना थोडा वेळ ती स्वतः ला देते. यातूनच त्यांना आनंद मिळतो. तसेच महिला दक्षता समिती नेहमीच महिलांच्या समस्या सोडवून त्यांना आधार देण्याचे काम करत असते. यावेळी महिलांना झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वान म्हणून त्यांना गुलाबाची रोपे भेट देण्यात आली.

यावेळी शिरुर पोलीस स्टेशनच्या महीला पोलिस कर्मचारी रेखा टोपे, प्रतिमा नवले, शोभा ससे, सुवर्णा नरवडे, अर्चना यादव, भाग्यश्री जाधव तसेच महिला दक्षता समितीच्या उपाध्यक्षा शशिकला काळे, सदस्या सुवर्णा सोनवणे, जया खांडरे, वैशाली गायकवाड, पत्रकार किरण पिंगळे, सामाजिक सुरक्षा कक्षच्या शोभना पाचंगे, अ‍ॅड सिमा काशीकर, अ‍ॅड सरिता खेडकर,डॉ स्मिता कवाद, सुषमा शितोळे, सारिका वीर्सेव, ज्योती हांडे, कविता वाटमारे, ललिता पोळ, प्रियंका धोत्रे, प्रतीक्षा पवार, आजी-माजी नगरसेविका, सरपंच, सदस्या,सामाजिक कार्यकर्त्या तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शर्मिला नीचीत यांनी तर आभार राणी कर्डिले यांनी मानले.