त्या १९ वर्षीय तरुणाच्या खुण प्रकरणी भावकीतीलच जिवलग २० वर्षीय तरुणाला अटक…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

अहिल्यानगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला तपास लावण्यात यश 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर – श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर असलेल्या दाणेवाडी येथील माऊली गव्हाणे या १९ वर्षीय तरुणाचा निघृण खुण झाला होता. अखेर खुणाला वाचा फुटली व अवघ्या चारच दिवसात या खून प्रकरणाचा उलगडा अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाने लावला असून,हा गुन्हा करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर तो माऊलीचा तो त्याच गावातील भावकीतील नातेवाईक असून त्याचा जीवलग मित्र होता. सागर दादाभाऊ गव्हाणे ( वय २०) रा. दाणेवाडी ता. श्रीगोंदा असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे. हा एवढा निर्घन खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला. यात आणखी कोणी मदत करणारे आरोपी आहेत का? याबाबतचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे हे कारण गुलदस्तात राहिले आहे. पुणे -अहिल्यानगर जिल्हयबरोबरच शिरूर – श्रीगोंदा तालुका हादरवून सोडणारा माऊली गव्हाणे याच्या खुनाचा तपास अहिल्यानगर पोलीस अधीक्षक ओला व गुन्हे आणि मिशन विभागाच्या पथकाने मोठ्या सीताफिने लावला याबद्दल दोन्ही जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.

माऊली सतीश गव्हाणे या तरुणाचा (दि. १२) मार्च रोजी खून करण्यात आला होता. हा खून इतका क्रूर करण्यात आला होता. या तरुणाचे डोके, दोन हात, पाय असे साह्याने कट करून दाणेवाडी गावातच असणाऱ्या आरोपीच्या घरासमोरील दोन विहिरीमध्ये दोन पोत्यांच्या गाठोड्यात दगड सह टाकले होते. हे आरोपी इतके शातीर होते की त्यांनी अतिशय शांत डोक्याने हा खून करून अवयव घराजवळील दोन विहिरीत टाकले होते. या तरुणाचा मृतदेह सापडल्यापासून पोलिसांना कुठलाही असा ठोस् पुरावा मिळत मिळत नव्हता.

परंतु तरुणाचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे त्याच्या घराजवळच होते व तेथेच त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. त्यामुळे तपास करणारे पोलीस चक्रावले होते. (दि.१६) रोजी रोजी तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत तपास करत असताना सदरचा गुन्हा हा आरोपी न १) सागर दादाभाऊ गव्हाणे, (वय २०), रा.दानेवाडी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली आहे. तसेच सदरचा गुन्हा ताब्यातील आरोपीने केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयांचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर हे करीत आहेत.

सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, . प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.