निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करिता रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार मतदारांकडून निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करणे करिता १९८- शिरुर विधानसभा मतदार संघातील सर्व ४०१ मतदान केंद्रावर रविवार (दि. 11) सप्टेंबर रोजी ऐच्छिक तत्वावर निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करिता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करुन घ्यावे, असे आवाहन १९८ शिरुर विधानसभा मतदार संघाचे उपविभागीय अधिकारी पुणे- शिरुर तथा मतदार नोंदणी अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी केले आहे.

१९८ – शिरुर विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार शिरुर प्रशांत पिसाळ यांनी याबाबत सर्व मतदान केंद्रावर बी. एल. ओ. यांची ऐच्छिक तत्वावर निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करिता नेमणूक करणेत आलेली आहे. १९८ शिरुर विधानसभा मतदार संघात एकूण ४०१ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर रविवार (दि. 11) सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायं 6 वाजेपर्यंत ऐच्छिक तत्वावर आयोजन करण्यात आले असून त्या ठिकाणी बी. एल. ओ. उपस्थित राहून मतदारांचे निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करुन देणार आहेत.

तसेच http://nvsp.in किंवा http://veterportal.eci.gov.in , Voter Helpline App या माध्यमाद्वारे मतदारांना निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.