crime

शिरुर तालुक्यात दोन महिलांना मारहाण केल्याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील तीन जणांवर गुन्हे दाखल

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी येथे राहणाऱ्या जोगवा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबातील दोन महिला चुलीसाठी सरपण गोळा करत असताना जुन्या वादाच्या कारणावरुन तीन जणांनी त्यांना शिवीगाळ करत डोक्यात चाकू मारुन जखमी केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे राहुल महादेव सावंत अभिषेक महादेव सावंत, महादेव साहेबराव सावंत सर्व सध्या (रा. जुना टोलनाक्याजवळ, रांजणगाव ता. शिरुर जि.पुणे, मुळ रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) या तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नपुर्णा रुपचंद शिंदे (वय 50) जोगवा रा. ढोकसांगवी, पाचंगेवस्ती, ता. शिरुर जि. पुणे येथे त्यांचे पती रुपचंद रामा शिंदे, मुलगी पालका नाथा चव्हाण, मुलगा ईश्वर आणि सुन प्रियंका ईश्वर शिंदे यांच्यासोबत राहत असुन असुन हेसर्वजण गोसावी म्हणुन घरोघरी देवीची परडी घेऊन जोगवा मागुन उदरनिर्वाह करतात.

 

बुधवार (दि 30) रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास अन्नपूर्णा शिंदे आणि त्यांची मुलगी पालका चव्हाण या दोघी पांचगेवस्ती येथील मंदीराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत चुलीसाठी सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या असताना तेथे राहुल सावंत, अभिषेक सावंत, महादेव सावंत हे तिघेजण आले. त्यावेळी त्यांनी जुन्या वादाच्या कारणावरुन मनात राग धरुन शिवीगाळ दमदाटी केली. महादेव सावंत याने त्याच्या हातातील चाकुने अन्नपूर्णा यांच्या डोक्यात मारहान केली आणि राहुल सावंत याने त्यांची मुलगी पालका चव्हाण हिच्या डोक्यात चाकुने मारहान करत दुखापत केली. तसेच अभिषेक सावंत याने त्या दोघी माय लेकीनां हाताने तसेच लाथाबुक्यांनी मारहान करत शिवीगाळ व दमदाटी केली.

 

त्यानंतर अन्नपूर्णा शिंदे यांनी राजणगांव MIDC पोलीस स्टेशन येथे धाव घेत फिर्याद दाखल केली. या घटनेचा पुढील तपास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गारे हे करत आहेत.