छत्रपतींच्या समाधीहून निघणार जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा

मुख्य बातम्या

वढू बुद्रुक मध्ये तुकाराम महाराजांच्या वंशजांसह आदींनीकडून निषेध

धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी धर्मदिन जाहीर करण्याची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपूर येथील विधानसभेतील अधिवेशनामध्ये संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेतच, असे बेताल व्यक्तव्य केले, तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब यांचे समर्थन केले आणि खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपतीं करा इतिहास दाखवला नसल्याचा तुकाराम महाराजांच्या वंशजांसह अनेकांनी निषेध व्यक्त करत छत्रपतींच्या समाधीहून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पायी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोल्हे यांच्या निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज ह. भ. प. शिरीषमहाराज मोरे, धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज मोहिते, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल काशीद, तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे, युवासेनेचे अध्यक्ष वैभव ढोकले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, सचिन भंडारे, दिपक काटे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, रवी पडवळ, किरण मुंगसे,स्वप्नील शिवले, अविनाश मरगळ यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान अनेकांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोल्हे, आमदार अमोल मिटकरी, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा कडक शब्दात निषेध व्यक्त करत अमोल कोल्हे छत्रपतींच्या नावावर खासदार होऊन मोठे झाले असून छत्रपतींच्या समाधीच्या कार्यक्रमास कलाकार म्हणून येण्यास देणगी मागत असल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान 11 जानेवारी रोजी छत्रपतींच्या समाधी स्थळाहून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पायी मोर्चा काढून केंद्रसरकार व राज्य सरकार यांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या दिवशी धर्मदिन जाहीर करावा, अशी मागणी करत निवेदन देण्यात येणार असल्याचे आंदोलाकांनी जाहीर केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील शिवले यांनी केले तर अविनाश मरगळ यांनी आभार मानले.

स्थानिक शंभू भक्तांना पक्षाची चौकट…

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे अनेक शंभू भक्त पदाधिकारी असून गावात अथवा समाधी स्थळावरील प्रत्येक कार्यक्रमात अग्रस्थानी असलेले दिग्गज पदाधिकारी सध्या राष्ट्रवादी पक्षामध्ये असल्याने आजच्या समाधी स्थळावरील कार्यक्रम प्रसंगी सर्वच पदाधिकारी गायब असल्याने स्थानिक शंभू भक्त पक्षाच्या चौकटीत अडकले असल्याचे दिसून आले.