मुखईच्या पलांडे शाळेचे अठ्ठावीस विद्यार्थी शिष्यवृत्तीत चमकले

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे मध्यमिक आश्रम शाळेतील 35 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी साठी बसलेले असताना त्यापैकी तब्बल 28 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले असून 18 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकले असताना त्यापैकी 2 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये दुसऱ्या व आठव्या क्रमांकावर झळकले असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे मध्यमिक आश्रम शाळेतील पस्तीस विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले होते. नुकताच सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शाळेतील प्रज्वल वनवे २७६ गुण, गौरी जाधव २६४ गुण, समृद्धी काळोखे व महेश झगडे २५० गुण, राजवर्धन शिरसाट २४४ गुण, वेदिका मोहिते २४० गुण, प्राजक्ता शेवाळे २३४ गुण, अथर्व देशमुख २६६ गुण, श्रावणी पाटील २२४ गुण, सुजित पुंड २१८ गुण, आश्लेषा माळी २१२ गुण, स्नेहल लवटे २१० गुण, सिद्धी शिंदे व सिद्धेश पाटील २०२ गुण, अनुश्री गुरव १९८ गुण, आर्या शिरसाठ १९० गुण, तन्मय बिचकुले १८८ गुण, अस्मिता गोरे १४८ गुण असा प्रकारे विद्यार्थ्यांनी गुण संपादित करत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले.

यापैकी प्रज्वल पोपट वनवे याने राज्य गुणवत्ता यादीमध्ये द्वितीय तर गौरी प्रसाद जाधव हिने राज्य गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकावला मुखई आश्रम शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीस यश व गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जात असताना विद्यार्थ्यांनी कायम दोन आकडी निकालाची परंपरा राखलेली असताना सध्याच्या यशामुळे विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम राखली आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना किशोर गोगावले, पांडुरंग गायकवाड, अनिता डमरे, मनोज धिवार मार्गदर्शन केले, तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य तुकाराम शिरसाट, संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई पलांडे, कार्याध्यक्ष अँड अशोकराव पलांडे, सचिव सुरेशराव पलांडे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.