शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्था अध्यक्षासंह पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या (Shirur Shikshan Prasarak Mandal) कर्मचाऱ्याने सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापकपद मिळवण्यासाठी संस्थेविरोधात याचिका दाखल केल्याने त्याचा वारंवार मानसिक छळ करत आर्थिक लाभापासून वंचित ठेवुन, दबाव व दमदाटी करुन कोऱ्या दस्तऐवजावर सह्या घेऊन सर्वासमक्ष जातीयवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था अध्यक्ष नंदकुमार निकम यांच्यासह संस्था सचिव प्रकाश बोरा, शाळा समिती सदस्य अनिल बोरा, पर्यवेक्षक कुमारपाल बोरा, वरीष्ठ लिपिक सुभाष पाचकर, सुरज जाधव यांच्यावर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये (Ranjangaon MIDC Police) अँट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने शिरुर शहरात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

याबाबत सविस्तर माहीती अशी की, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या मंगलमुर्ती विद्याधाम शाळा, रांजणगाव येथे मुख्याध्यापक म्हणुन नियुक्तीस असलेले काशिनाथ वेताळ (रा. जोशीवाडी, शिरुर) यांना सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदासाठी पात्र असतानाही शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक यांनी त्यांना मुख्याध्यापकपद देण्यास नकार दिल्याने त्यांनी संस्थेविरुध्द शिक्षण अधिकारी (माध्यमिक) पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीच्या विरोधात संचालक मंडळ यांनी उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट पिटिशन क्रं 8760/2004 तसेच 2729/2007 अन्वये दाखल केलेल्या असुन त्या न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच शाळा न्यायधिकरण पुणे येथे पदोन्नोतीबाबत संचालक मंडळ व ज्युनिअर अध्यापक यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती.

 

सदर याचिकेचा निकाल वेताळ यांच्या बाजुने लागला आहे. त्यानुसार शिक्षण अधिकारी, पुणे यांनी त्यांना दि.1 जुलै 2014 रोजी पासुन मुख्याध्यापकपदी नियुक्ती दिली असुन त्यांना मुख्याध्यापकपदाचा लाभ हा सन 2007 पासुन देण्याबाबत आदेशित केले आहे. दि.1 जुन 2022 रोजी पासुन वेताळ हे मंगलमुर्ती शाळा विद्याधाम येथे मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत आहेत. परंतु शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरोधात जावुन उच्च न्यायालयाच्या आदेशाने मुख्याध्यापकपद स्विकारल्याने शाळेचे शिक्षण प्रसारक मंडळाचे काही सदस्य हे त्यांच्या विरोधात चिडुन असल्याने ते नेहमीच वेताळ यांना टार्गेट करत होते.

 

तसेच जातीय शिविगाळ करत होते. शाळेतील इतर शिक्षक व क्लर्क यांना देखील मुख्याध्यापक म्हणून काम करतांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य न करण्याबाबत सांगुन त्यांना दैनंदिन कामकाज करतांना मानसिक त्रास देत होते. त्यांच्या छळाला कंटाळून मुख्याध्यापक यांनी या बडया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासंह पाच जणांवर अँट्रॉसिटी कायद्याअंतर्गत विविध गुन्हे दाखल केले आहेत.