Manchar Cow

बटाट्याचा पाला खाल्यानंतर गाई व्यवसायिकांच्या २० गाई मृत्युमुखी…

महाराष्ट्र

निरगुडसर (मंचर) : बटाट्याचा पाला खाल्यानंतर विषबाधा झाल्यामुळे राजस्थानी गाई व्यवसायिकांच्या १६ मोठ्या गाई ४ कालवडी अशा एकूण २० गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे घडली आहे.

राजस्थानी गाई व्यवसायिकांच्या एकूण ३० ते ४० गायांना विषबाधा झाली आहे. काही गायांची प्रकृती चिंतानजक असल्यामुळे आणखी काही गाई दगावण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

निरगुडसर मेंगडेवाडी हद्दीवरील रस्त्यावर राजस्थान येथून आलेले लालगाई वाले गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे १५० गाई, वासरे आहेत. ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लाल गाई पाळतात. दुग्ध व्यवसाय व शेणखत विक्री करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. निरगुडसर व आजूबाजूच्या परिसरातील फ्लावरचा पाला, बटाट्याचा पाला, कांद्याची पाथ व शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिलेला भाजीपाला, तरकारी ते त्यांचे गायांना खाण्यासाठी घेऊन येत असतात.

दोन दिवसांपूर्वी हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांनी थोरांदळे येथील एका शेतकऱ्याचा शेतात कापून ठेवलेला बटाट्याचा पाला गायांना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर त्यांच्या गायांना विषबाधा झाली व २० लहान मोठी जनावरे आतापर्यंत मृत्युमुखी पडली आहेत. तर ३० ते ४० गायांची प्रकृती गंभीर आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून गायांवर औषध उपचार सुरु आहेत. एकूण २० जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिरुर तालुक्यात जनावरांना होऊ लागला लंपी आजाराचा शिरकाव

शिक्रापूर परिसरात जनावरे चोरणारे तिघे २४ तासात जेरबंद

निमगाव दुडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

निडर गोरक्ष दलाने कत्तलखान्यात जाणाऱ्या 100 म्हशी व रेडकुंचे वाचवले प्राण

गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात!