एका बड्या IT कंपनीतील 80 टक्के कर्मचाऱ्यांना एकाचवेळी नोकरीवरुन काढले पहा कारण…

महाराष्ट्र

अमेरिका: IT क्षेत्रात खळबळ माजवणारी घडामोड घडली आहे. एका बड्या IT कंपनीतील 80 टक्के कर्मचाऱ्यांना एकाचवेळी नोकरीवरुन काढण्यात आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स तंत्रज्ञान वापराचा परिणाम थेट नोकऱ्यांवर होत असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेच्या एका बड्या IT कंपनीत हा प्रकार घडला आहे. अमेरिकेतील इग्नाइटटेक कंपनीतील 80 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली आहे. इग्नाइटटेक कंपनीचे सीईओ एरिक वॉन यांनी 2023 मध्ये एक अतिशय कठोर निर्णय घेतला होता. एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) स्वीकारण्याच्या धोरणाला विरोध करणाऱ्या कंपनीतील 80 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले. यापुढेही कामात एआयचा वापर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

वॉनने 2023 च्या सुरुवातीला म्हटले होते की एआय हा व्यवसायासाठी एक मोठा धोका आहे. त्यानंतर त्यांनी “एआय सोमवार” सुरू केला, जिथे दर सोमवारी कर्मचाऱ्यांना फक्त एआयशी संबंधित काम करावे लागत असे. शेकडो कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण बदलाला विरोध केला. त्यांना पटवून देण्याऐवजी, वॉनने त्यांच्या जागी नवीन कर्मचारी आणण्याचा निर्णय घेतला.

यात तांत्रिक तज्ञही मागे होते, मार्केटिंग टीम पुढे होती. सर्वात जास्त विरोध तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून झाला. वॉनच्या मते, या कर्मचाऱ्यांनी एआयच्या मर्यादांबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच त्याच्या क्षमता स्वीकारण्यास कर्मचारी कचरत होते. याउलट, मार्केटिंग आणि सेल्स टीम नवीन एआय टूल्स आणि प्रशिक्षणासाठी उत्सुक दिसत होत्या. वॉनने कंपनीच्या पगाराच्या 20 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना एआय शिकवण्यासाठी खर्च केली. यामध्ये एआय टूल्स आणि ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’ सारख्या वर्गांवरील खर्चाची परतफेड समाविष्ट होती. परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी यात अडथळा आणला तसेत AI तंत्रज्ञान पूर्णपणे नकार दिला. या विरोधामुळे, कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मोठा भाग 12 महिन्यांत बदलला.

2024 पर्यंत, या कठीण बदलाचे फायदे दिसू लागले. इग्नाइटटेकने दोन नवीन एआय उत्पादने लाँच केली ज्यांचे पेटंट प्रक्रियेत आहेत. त्यांनी एक मोठी कंपनी देखील विकत घेतली आणि सुमारे 75 टक्के इतका उच्च नफा (EBITDA) देखील मिळवला. यावरून असे दिसून येते की वॉनचा कठोर दृष्टिकोन कामी आला. एका संशोधनानुसार, ही समस्या फक्त त्यांच्या कंपनीची नाही. एक तृतीयांश कर्मचारी कंपनीच्या एआय योजनांवर टीका करतात. 41 मिलेनियल आणि झेन जी कर्मचारी एआय अंमलबजावणी टाळण्याचा प्रयत्न करतात.