ashok-bhorde

शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे आत्मदहनावर ठाम

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यातील मंडल अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द न केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे हे उद्या (दि 2) ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करणार आहेत.

सन 2023 या बदली कालावधी मध्ये पुणे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी पुणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे तहसीलदार यांनी संगनंमताने अनेक अव्वल कारकून, सर्कल यांची मंडल अधिकारी या कार्यकारी पदावरती नियुक्ती करुन शासननिर्णय व परिपत्रक याचे उल्लंघन करत सदर लोकसेवकांच्या बेकायदेशीर बदल्या केल्या. याबाबत अशोक भोरडे यांनी हि बाब प्रखरतेने शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती आणि नियमबाह्य बदल्या तातडीने रद्द कराव्यात व प्रामाणिक सर्कल, अव्वल कारकून यांना मंडल अधिकारी या कार्यकारी पदावरती नियुक्त करावे मागणी केली होती.

परंतु जिल्हाधिकारी पुणे व निवासी उपजिल्हाधिकारी पुणे यांनी केलेल्या नियमबाह्य बदल्या रद्द न केल्यामुळे जिल्हाधिकारी पुणे,निवासी उपजिल्हाधिकारी पुणे, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे तहसीलदार यांच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे हे उद्या (दि 2) ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या कार्यालयासमोर शासकीय अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराच्या विरोधात आत्मदहन करणार आहेत.

 

पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी राबविलेल्या आगळ्यावेगळ्या स्वच्छता अभियानाची चर्चा

 

पुणे जिल्ह्यातील मंडल अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य केलेल्या बदल्या रद्द करणार…? की अशोक भोरडे यांचा बळी घेणार…?

 

पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये झालेल्या तलाठ्यांच्या दप्तर तपासणीमुळे महसूलचे धाबे दणाणले..