नागरिकांच्या सतर्कतेने राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान

शिरूर तालुका

मुंगसांच्या हल्ल्यातून जखमी मोराची शेतकऱ्याकडून सुटका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका शेतात मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मोराला नागरिकांच्या सतर्कतेने प्राणीमित्र व वनविभागाच्या मदतीने जीवदान देण्यात यश आले असून मोराला कात्रज प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आले आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील रणदिवे वस्ती येथे हरीश्चंद्र रणदिवे यांच्या शेतात काही मुंगुस मोरावर हल्ला करुन जखमी करत असल्याचे हरीश्चंद्र रणदिवे यांना दिसून आले त्यांनी येथील मुंगसाच्या तावडीतून मोराची सुटका करत याबाबतची माहिती शिरुर वनविभागाचे वनपरीमंडळ अधिकारी प्रवीण क्षीरसागर यांना दिली. त्यानंतर वनरक्षक प्रमोद पाटील, अभिजित सातपुते, इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी त्या ठिकाणी धाव घेत जखमी मोराला ताब्यात घेतले. यावेळी माजी सरपंच रेश्मा काळे, पोलीस पाटील किरण काळे, हरीश्चंद्र रणदिवे, गणेश शिर्के, रमेश रणदिवे, संभाजी गोरडे, महेंद्र शिर्के, दत्तात्रय रणदिवे, प्रथमेश रणदिवे, अभिनव गोरडे, तुषार रणदिवे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी जखमी मोराला उपचारासाठी कात्रज प्राणी संग्रहालयात रवाना करण्यात आले, तर याबाबत बोलताना मोर आपला राष्ट्रीय पक्षी असून देशाची संपत्ती आहे. सदर संपत्ती जतन करण्यासाठी प्राणीमित्र व वनविभागाने तातडीने पावले उचलल्याने राष्ट्रीय पक्षाला जीवदान मिळाले असून आपली संपत्ती जतन करण्यासाठी नागरिकांनी पुढे येथे गरजेचे असल्याचे पोलीस पाटील किरण काळे यांनी सांगितले.