शिरूरच्या सेतू कार्यालयातील सर्व्हर ठप्प, 2 दिवसात सुधारणा न झाल्यास तहसिल कार्यावर मोर्चा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी व शासकिय भरतीचे फॉर्म भरण्यासाठी येतायेत अडचणी 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह जिल्हाभरातून सेतू कार्यालय व महा ई सेवा केंद्र यांची महाऑनलाईन सेवा गेल्या 15 दिवसापासून वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे शालेय प्रवेशासाठी व शासकिय भरतीचे फॉर्म भरण्यासाठी विदयार्थ्यांची डोकेदुखी वाढली असून शालेय प्रवेशासह सरकारी भरतीला मुकावे लागणार आहे.

शाळा, कॉलेज, शासकिय सेवेत भर्ती होण्यासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, डोमासाईड, नॉन -क्रिमिनिल, जात प्रमाणपत्र, ews, अश्या प्रकारचे अनेक कागदपत्रे शिरूर तहसीलच्या सेतू कार्यालयामधून काढण्यासाठी येणाऱ्या पालकांना आणी विद्यार्थ्यांचे महाऑनलाईन सेवा सर्व्हर बंद असल्यामुळे हाल होत असून त्यांना या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे.

महाऑनलाईन सेवा गेले 15 दिवस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना उत्पन्न, डोमासाईड, नॉन -क्रिमिनिल,जात प्रमाणपत्र, ews आदी प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. या सर्व प्रकाराला महाऑनलाईनचे कामकाज पाहणारे आधिकारी हे जबाबदार असून शिरूर तालुक्यातील पालक व विदयार्थी आक्रमक झाले असून या सेवेत 2 दिवसात सुधारणा न झाल्यास तहसिल कार्यावर मोर्चा काढणार असल्याचे सजग पालकांनी सांगितले आहे.