शिरुर ग्रामीण रुग्णालयात अधिकाऱ्यांच्या मुजोरपणामुळे भटक्या कुत्र्यावर उपचार

आरोग्य मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील ग्रामीण आरोग्य रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने पेशंटच्या इमर्जन्सी बेडवर भटक्या कुत्र्यावर ऊपचार करण्यात आले आहे. येथील आरोग्य अधिकाऱ्याच्या मुजोरपणामुळे तसेच हेकेखोर व चुकीच्या ऊपचार पध्दतीमुळे जखमी भटक्या कुत्र्यावर रुग्णालयात ऊपचार करण्याची दुर्दैवी वेळ या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आली आहे.

 

त्यामुळे हे रुग्णालय माणसांसाठी आहे की जनावरांसाठी…?असा सवाल आता नागरिकांकडुन ऊपस्थित केला जात आहे. शिरुर शहरातच सरकारी पशुवैदयकीय दवाखाना असताना जखमी कुत्र्यावर माणसांच्या दवाखान्यात उपचार का…? आणि कोणाच्या हट्टामुळे हा प्रकार घडत आहे याची चौकशी वरीष्ठांनी करणे गरजेचे आहे. रविवार (दि२१) एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असुन या प्रकाराची कुठेही वाच्यता होऊ नये. म्हणुन संबंधित मेडिकल आॕफीसरकडुन कर्मचाऱ्यांवर दबावही टाकला जात आहे.

 

याबबत सविस्तर वृत्त असे की, पोलिस पथकातील काही कर्मचारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून जातांना एका वाहनाने धडक दिल्याने जखमी अवस्थेत असलेले भटके कुत्रे रस्त्याच्या कडेला आढळुन आले. त्यामुळे मुक्या प्राण्याचा जिव वाचवावा ह्या हेतुने त्यांनी त्या कुत्र्याला जवळचा पर्याय म्हणून ग्रामीण रुग्णालयात आणले.

 

यावेळी ड्युटीवर असणारे डाॕ सुहास मैड यांनी कर्मचाऱ्यांना कुत्र्यावर उपचार करण्यास सांगितले. परंतु कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला. तरीही अधिकाराचा गैरवापर करत व मुजोरी दाखवत जखमी कुत्र्यावर प्रथमोपचार करण्याचा आदेश दिला गेला. त्यामुळे नाईलाजास्तव कामावर असणारे परीचारीका, शिपाई आणि कर्मचारी यांनी त्या कुत्र्यावर प्रथमोपचार केले. प्रथमोपचार झाल्यानंरही जवळपास १ तास ते जखमी कुत्रे रुग्णालयातच ऊपचार कक्षात पडून होते. त्यामुळे अजुनही हे कुत्रे कुणी का घेऊन गेले नाही असा सवाल डाॕ.मैड यांनी कर्मचाऱ्यांना केला.

 

त्यानंतर काही कर्मचारी आणि डाॕ.मैड यांची शाब्दिक चकमकही झाल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा होत आहे. त्यानंतर डाॕ मैड यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तुम्हाला आता कारणे दाखवा नोटिसच बजावतो अशी तंबी दिली.

 

एकूणच तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना सेवा मिळणे अपेक्षित असतांना तसेच शिरुरमध्ये पशुवैदयकीय दवाखाना असतानाही जनावरांवर ऊपचार करुन नियमबाह्य काम करणाऱ्या ह्या मुजोर अधिकाऱ्याच्या डोक्यावर नक्की कुणाचा वरदहस्त आहे याची चर्चा शिरुर तालुक्यात रंगली आहे. तसेच जनावरांना पशुवैद्यकिय दवाखान्यात सेवा उपलब्ध असतांना स्वतः स्थानिक असल्याचा फायदा घेत हा डाॕक्टर मुजोरी करत आरोग्यसेवेचा गैरवापर करत असल्याचेही चित्र स्पष्ट दिसत आहे.

 

नगरच्या सिव्हील हॉस्पीटलमधील चौदा जणांचा जीव घेणाऱ्या ‘डॉ पोखरणा’ यांची शिरुरला दोन वर्षापुर्वी नियुक्ती झाली. ते कार्यरत असताना नगरच्या सिव्हील हॉस्पीटलला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यांनतर त्यांचे निलंबन झाले आणि नंतर काही दिवसातच ते शिरुरला हजर झाले. हे वैद्यकिय अधिक्षक डाॕ.सुनिल पोखरणा रुग्णालयात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा म्हणजेच फारसे फिरकत नसल्याने आणि तात्पुरती कामे इतर ज्युनिअर अधिकाऱ्यांवर सोपवत आहेत. हि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुणांना व्यवस्थित उपचार भेटत नाही.

 

ग्रामीण रुग्णालयाचा सगळा कारभार डाॕ सुहास मैड यांच्या हातात आहे. अगदी किरकोळ कारणामुळे डाॕ. मैड कर्मचाऱ्यांची अडवणुक करत असल्याची चर्चा होत आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकावर अनावश्यक शेरे मारणे, त्यांना किरकोळ गोष्टीवरुन वारंवार कारणे दाखवा नोटिस बजावणे आणि वेठीस धरण्याचे प्रकार वाढले आहेत. ही चर्चा कर्मचाऱ्यांमधून वारंवार होत आहे .त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी आता नागरिकांकडुन केली जात आहे.

 

या वादग्रस्त अधिकाऱ्यांची बदली अन्य ठिकाणी केली पाहीजे. नाहीतर नगरसारखा प्रकार शिरुरला झाल्याशिवाय राहणार नाही. अजुन किती जणांचे प्राण आपण या डॉक्टरच्या हातात देणार आहोत. यापुढे उपचार घेणारे सर्वसामान्य लोक आणि रुग्ण या हॉस्पीटलमध्ये उपचार घेणार नाही हे मात्र नक्की.

 

भटके कुत्रे दोन वाटसरु धरुन घेऊन आले होते. मित्राने मदत मागितली म्हणुन माणुसकीच्या नात्याने मदत केली. कुऱ्याला आतमध्ये घेऊन उपचार दिला हे चुकीचे होते.

डॉ सुहास मैड 

ग्रामीण रुग्णालय, शिरुर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत