रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले असुन रात्रीच्या वेळी शेतात पाणी देणे म्हणजे जीव मुठीत धरुन जाण्यासारखे झाले आहे. एका बाजूला बिबट्याचा धोका तर दुसऱ्या बाजूला चोरट्यांचा सुळसुळाट या दुहेरी संकटामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
एकीकडे बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी रात्री शेतात जाण्याचे टाळतात. तर दुसरीकडे याचाच फायदा घेत चोरटे बोरवेल व विहिरींतील वीजेच्या मोटर केबल्स कापून चोरी करतात. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
या घटनांविरोधात शेतकऱ्यांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या असल्या तरीही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, तातडीने प्रभावी उपाययोजना करून बिबट्या व चोरट्यांच्या धोक्यापासून संरक्षण द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे नर बिबट्या जेरबंद ; वनविभागाची कारवाई
आरोग्य केंद्रातील मुजोर डॉक्टरवर वरीष्ठांची कारवाई कधी? कारवाई न झाल्यास ग्रामस्थ करणार उपोषण
पिंपरी दुमाला येथे अज्ञात चोरट्यांकडून दहा शेतकऱ्यांची तांब्याची केबल व मोटारची चोरी