सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डीले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): बुधवार (दि 31) रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रामलिंग येथील सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, शिरुर ग्रामीणच्या सरपंच स्वाती घावटे तसेच अंगणवाडी सेविका वैशाली हारके यांना मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.

शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. शासनाच्या परिपत्रका नुसार या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यावेळी शिरूर ग्रामीण चे ग्रामसेवक दत्तात्रय केदारी, सरपंच स्वाती घावटे, माजी सरपंच नितीन बोऱ्हाडे, उपसरपंच अभिलाष घावटे, राहुल महाजन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या नियोजन समितीच्या अध्यक्षा किरण पिंगळे, अंगणवाडी सेविका अर्चना कर्डिले, शीतल कापरे तसेच सर्व कर्मचारी, महिला व मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच यशवंत कर्डिले तर आभार उपसरपंच तुषार दसगुडे यांनी मानले.