शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडुन जेरबंद

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील नागरगाव येथील महेंद्र मुगुटराव शेलार यांचा घरासमोर उभा असलेला स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबत 1 ऑक्टोबर रोजी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकामार्फत करीत असताना तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सदरचा गुन्हा हा इसम अजय जगण बेरड रा. दरेवडी अहमदनगर याने त्याच्या इतर साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती गोपनीय बातमीदारांच्या मार्फत मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरेवडी अहमदनगर येथून त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने सदर चां गुन्हा हा त्याचे इतर साथीदार १ )धीरज प्रमोद घोडके रा दरेवाडी अहमदनगर २ ) इरफान मुनीर पठाण रा सदर ३ )रवी रमेश बायकर रा .पुंडी. ता आष्टी जी .बीड यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलिसांनी धीरज प्रमोद घोडके व रवी रमेश बायाकर यांना दारेवाडी अहमदनगर येथून सापळा रचून ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला सुमारे 3 लाख 40 हजार रुपयांचा स्वराज कंपनीचां ट्रॅक्टर व डम्पिंग ट्रॉली जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश गटटे, उपविभागीय पोलीस अधीकारी यशवंत गवारी यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,सहायक फौजदार तुषार पंधारे,पोलिस हवालदार जनार्दन शेळके, राजु मोमीन,पोलिस कॉन्स्टेबल दगडू विरकर यांनी केली आहे.