शिरुर तालुक्यात 22 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांची सभा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) मुंबई येथे मराठा आरक्षण संदर्भात आंदोलन करण्यासाठी मराठा आरक्षण क्रांतीयोध्दे मनोज जरांगे पाटील हे शिरुर मार्गे मुंबई येथे जाणार असून शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे सोमवार दि २२ जानेवारी 2024 रोजी मनोज जरांगे पाटील याचा मुक्काम व जाहीर सभा होणार आहे. त्याच्या नियोजनाबाबत सकल मराठा समाजाची न्हावरा फाटा (ता . शिरुर) येथील कानिफनाथ मंगल कार्यालयात बैठक संपन्न झाली .

 

या बैठकीत आंदोलनकर्त्याची भोजनव्यवस्था, निवासव्यवस्था,पाणीव्यवस्था, चहा नाष्टा तसेच अन्य बाबी संदर्भातील नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. जरांगे पाटील यांची सभा व मुक्काम कारेगाव येथील पुणे-नगर रोड वरील व्हर्लपूल कंपनी समोरील १०० एकराहून अधिक जागा असणा-या ठिकाणी होणार असुन याठिकाणीच सभा व आंदोलनकर्त्यांचा मुक्काम होणार आहे.

 

शिरुर तालुका तसेच शिरुर शहरातील घराघरातून आंदोलनकर्त्यासाठी चपाती आणि शेंगदाणा चटणीचे संकलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध गावातुन बुंदीचेही संकलन करण्यात येणार आहे. यास सर्वानी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शिरुर शहर व तालुक्यातून रुग्णवाहिका ही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पुणे-नगर रस्त्यावर विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टॅकर व फुड पॅकेटस, चहा यांचे वाटप करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.

 

याबैठकीला शेखर पाचुंदकर पाटील, संजय बारवकर, श्यामकांत वर्पे, आबासाहेब सोनवणे, श्रीनिवास घाडगे, राजेंद्र जगदाळे, नानासाहेब लांडे, संभाजी कर्डिले, भास्कर पुंडे, जयवंत साळुंखे, शोभना पाचंगे, वर्षा काळे, राणी कर्डिले, गीताराणी आढाव, सत्वशीला पाचंगे, सुदाम कोलते, गणेश खोले, उमेश शेळके, योगेश महाजन, अविनाश जाधव, के .बी काळे, वीरेंद्र कुरुंदळे ,सचिन जाधव, रमेश दसगुडे, विलास बत्ते, रुपेश घाडगे, आदित्य बो-हाडे, शामराव खरबस, कुमार नाणेकर आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.