sanaswadi

सणसवाडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाचा मान

शिरूर तालुका

शिक्रापूर: ध्वजारोहण करण्यासाठी अनेकांची रस्सीखेच चालल्याचे चित्र नेहमी दिसत असताना काही ठिकाणी ध्वजारोहणाचा मान मिळवण्यासाठी मोठमोठी पदे खेचून आणली जात असताना सणसवाडी येथील ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या ध्वजारोहणाचा मान चक्क ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची ध्वजारोहण करत सुरवात करण्यात आली. यावेळी सरपंच संगिता हरगुडे, उपसरपंच सागर दरेकर, ग्रामपंचायत सदस्या रुपाली दरेकर, राजेंद्र दरेकर, कीर्ती दरेकर, नवनाथ हरगुडे, दगडू दरेकर, ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे, बबन हरगुडे, ग्रामपंचायत कर्मचारी विष्णू गोसावी, संभाजी दरेकर, गौतम चव्हाण, रेखा चौधरी यांसह आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी करण्यात येणारे ध्वजारोहण आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करत ध्वजारोहण करावे, असा सल्ला उपसरपंच सागर दरेकर यांनी उपस्थितांना दिला अन सर्वांनी होकार देत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी देकील आनंदित झाले असून आम्हाला ध्वजारोहणाचा मान मिळाल्याचा मोठा आनंद होत असल्याचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले.