शिरुरच्या पोलिसांनी कारवाई करत केली 65 हजारांची दंड वसुली

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरूर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेमार्फत आज (दि 17) रोजी शिरुर शहरामधील बी.जे कॉर्नर, निर्माण प्लाझा, सिटी-बोरा कॉलेज रोड अशा गर्दीच्या ठिकाणी दुचाकीला नंबर नसणे, नंबर प्लेटवर नाव टाकने, नंबरप्लेट वर ग्रुपचे नाव लिहणे अशा मोटर सायकल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असून, इतर मोटर सायकल चालकांवर लायसन नसणे 5 रुपये एकुण दंडवसुली, ट्रिपलसिट 1 हजार रुपये एकुण दंडवसली, विनाकारण हॉर्न वाजवणे एकुण 1 हजार दंडवसुली अशा एकूण 32 मोटर सायकलवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 65 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, महिला पोलीस नाईक भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके यांनी केली असुन यापुढे निर्माण प्लाझा तसेच सी टी बोरा कॉलेजरोडला विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्या टवाळखोर युवकांवर तसेच 18 वर्षाखालील वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.