शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव व कर्डेलवाडी येथे मतदान शांततेत

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि 5) मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत पार पडली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन एकुण 85.27 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणुक निर्णय अधिका-यांनी सांगितले.

रांजणगाव गणपती ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकुण नऊ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सरपंच पदासाठी अनुसुचित जाती महिला प्रवर्ग असे आरक्षण आहे. तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी अपक्षांसह 39 उमेदवार रिंगणात होते.

 

रांजणगाव गणपती येथील वार्ड निहाय मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे वार्ड क्रमांक एक ८९७ पैकी ७८७ मतदान, वार्ड क्रमांक दोन १४२० पैकी ११२५, वार्ड क्रमांक तीन ११०८ पैकी ९८४ वार्ड क्रमांक चार ६८५ पैकी ६०३ , वार्ड क्रमांक पाच १३८१ पैकी ११९६ , वार्ड क्रमांक सहा १४४५ पैकी १२१८ असे एकूण ६९३४ मतदारांपैकी ५९१३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

दरम्यान कर्डेलवाडी (ता. शिरुर) येथे १२८० पैकी १०९७ मतदान झाले. या ग्रामपंचायत च्या सरपंच पदासाठी ओबीसी महिला हे आरक्षण असुन चार महिलांनी सरपंच पदाची निवडणुक लढवली आहे.

 

तसेच कारेगाव ता. शिरुर येथील झालेल्या पोटनिवडणुकीत वार्ड नंबर २ च्या ६८१ मतदारांपैकी ६०३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत शेवाळे विरुद्ध गवारे अशी लढत झाली.

 

रांजणगाव गणपती , कारेगाव व कर्डेलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाने उत्तम रितीने तयारी केली होती. निवडणुक प्रक्रिये दरम्यान कूठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रांजणगाव एमआयडीसी पोलीसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी व पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनानुसार हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.