शिरुरला पुन्हा प्रभारी तहसिलदाराची नियुक्ती; आमदार पवार उपोषण करणार का?

मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर ला पुन्हा पुर्णवेळ तहसिलदार न देता प्रभारी तहसिलदार दिल्याने शिरूर तालुक्यामधील नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे आमदार आता ३० जानेवारीपासून याबाबत उपोषण करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

शिरूर तहसिल कार्यालयात गेले अनेक दिवसांपासून प्रभारी तहसिलदार प्रशांत पिसाळ यांच्याकडे पदभार सोपावला होता. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीचा मुळ चार्ज असल्यामुळे शिरूरला जास्त वेळ देता येत नसल्याने नागरीकांची अनेक कामे रखडली होती. त्याबाबत अनेक संघटना, राजकिय व्यक्तीं सह आमदार अशोक पवार यांनी तहसिलदार नेमावा यासाठी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, शिरुर ला पुन्हा पुर्णवेळ तहसिलदार न देता प्रभारी तहसिलदार दिल्याने शिरूर तालुक्यामधील नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे आमदार आता ३० जानेवारीपासून याबाबत उपोषण करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, प्रशांत पिसाळ, तहसिलदार निवडणूक, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांना मुळपदाच्या कार्यभारासह तहसिलदार शिरुर, जिल्हा पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला होता. सबब, निवडणूक आयोग, भारत सरकार यांचेकडील प्रेस नोट क्रमांक ईसीआय/ पीएन/२/ ज्ञापन २०२३, दि. १८/९/२०२३ अन्वये पुणे जिल्ह्यातील २१५ कसाब पेठ विधानसभा मतदार संघ, पुणे व २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघ, पुणे या मतदार संघाच्या पोट निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे प्रशांत पिसाळ, तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक शाखा, पुणे यांचेकडील मुळपदाच्या कामाची व्याप्ती वाढलेली असल्याने अतिरिक्त कार्यभार असलेले तहसिलदार शिरुर, पुणे यांचेकडे मुळपदाचा कार्यभार सांभाळून पुढील आदेश होईपर्यंत शिरूर तहसिल कार्यालयाचा कार्यभार बालाजी सोमवंशी, तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय (पुनर्वसन शाखा) यांच्याकडे देण्यात आला आहे.

याबाबत आमदार अशोक पवार यांना संपर्क साधला असता मी संबंधित अधिकाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यातील काही दिवसांची वेळ दिली असुन त्यानंतर उपोषणाचा निर्णय घेण्यात येईल.