संजय राऊत यांची सुटका झाल्याने शिवसैनिकांनी वाजवले फटाके

शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके): शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांचे विश्र्वासू सहकारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची १०२ दिवसानंतर सुटका झाल्यामुळे आज निमोणे येथे शिवसेना, शेतकरीसेना यांच्या वतीने फटाके आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Ranjangaon marathon
Ranjangaon marathon

यावेळी सरपंच संजय काळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, तालुका सल्लागार संतोष काळे,शेतकरी संघटनेचे भरत काळे, विजय पोटे, तात्या काळे, गजानन जगताप, शिवसेना उपविभागप्रमुख आनंदराव ढोरजकर, ज्येष्ठ शिवसैनिक आबासाहेब काळे, नानासो रसाळ, अविनास रसाळ राजाराम काळे, आप्पाराव काळे, नागेश काळे, बाबुराव हिंगे आदी उपस्थित होते.