रांजणगाव MIDC पोलीसांनी क्रिकेटच्या टि शर्ट वरुन चंदनचोरांना ठोकल्या बेड्या

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील भांबार्डे गावच्या हद्दीत मळाबाई मंदिर परिसरातील 4 चंदनाची अज्ञात चोरट्यानी चोरुन नेली होती. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात अविनाश लक्ष्मण वीर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यानी घातलेल्या क्रिकेटच्या संघमालकाच्या नाव असलेल्या टि शर्ट मुळे चंदनचोराचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 22 सप्टेंबर 2022 रोजी भांबार्डे गावच्या हद्दीत मळाबाई मंदिर परिसरातील सुमारे 70 हजार किंमतीची 4 चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत पोलिस तपास करत असताना गुन्हा घडलेल्या ठिकाणी एक नारंगी रंगाचा क्रिकेटचा टि शर्ट मिळुन आला त्यावर पप्पु तसेच संघमालक अनिकेत खिलारी (रा. भराडी) असे लिहिलेले होते. त्या टि शर्ट च्या आधारे आरोपींचा शोध घेणे बाबत पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी आंबेगाव येथील जवळे येथे जावुन सराईत चंदनचोरांबाबत माहीती संकलित केली.

त्यानुसार 1) पोपट उर्फ पप्पु बाळु काळे (वय 23), 2) विजय सदाशिव काळे (वय 25) दोघेही रा. जवळे, ता. आंबेगाव, जि. पुणे. यांना ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांच्याकडुन 70,000/ रु. किंमतीचे चंदन जप्त केले आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, पुण्याचे अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी यांनी केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे हे करत आहेत.